
कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोला
सन १८९८ साली कायदेशीर कॉटन मार्केट कमिट्यांची स्थापना झाली .१९३५ साली मार्केट कायद्यात सुधारणा झाल्यात. मार्केट कायद्यातील महत्वाची सुधारणा म्हणजे शेतक-यांना मार्केट कमिटीमध्ये प्रतिनिधीत्व मिळणे ही होती, १९३५ साली शेतक-यांना प्रतिनिधीत्व मिळाले. याच वर्षी तालुका सहकारी खरेदी विक्रीची स्थापना झाली आणि शेतक-यांचे प्रतिनिधी नेतृत्व पुढे येवू लागले. बळीराम अंबाजी कुचर, उत्तमराव शिवरामजी देशमुख, वामनराव हरिभाऊ खुरसडे, पंढरी तुकाराम पाटील, नामदेवराव बळीरामजी पाटील, मोतीराम रावजी काळणे इत्यादी शेतकरी प्रतिनिधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात कॉटन मार्केट कमिटीवर प्रतिनिधीत्व केले.
सर्व माहितीसाठी....