बाजार विभाग

लेखा विभाग

दैनदिन व्यवहाराचे नोंदी टॅली सॉफ्टवेअर मध्ये संगणीकृत करुन आर्थिक पत्रके तयार करणे तसेच बँक संबंधीत सर्व व्यवहाराचे कामकाज करणे. आर्थिक वर्षात अर्थसंकल्प पणन मंडळाकडे सादर करणे. शासनाला देय असलेले सर्व कर तसेच विविध देय भरणा करणे. लेखा विभागा संबंधित सर्व कामकाज करणे.

सांख्यकि विभाग

दैनंदिन बाजार भाव काढुन महाराष्ट्र राज्य ‍कृषि, पणन मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे, वार्षिक बाजार भाव भरणे.

आस्थापना विभाग

बाजार समितीचे आस्थापनेवरील सर्व कर्मचारी, रोजंदारी कामगार यांचे आस्थापना संबंधीत सर्व आदेश काढणे रजा खतावनी नोंदविने त्यांचे कामकाजाचे नियोजन करणे त्या संबंधीत सुचना पत्र देणे इत्यादी.

अनुज्ञप्ति विभाग

बाजार समिती मध्ये खालील प्रमाणे परवानाधारक आहेत.

अनु.क्र. अनुज्ञप्ति प्रकार एकुन अनुज्ञप्ति
अडते २२९
खरेदीदार १७०
हमाल १८८
मापारी ८६

अनुज्ञप्ति करीता आवश्यक कागदपत्रे

अ. खरेदी अनुज्ञप्ति - अर्जदाराचे दोन फोटो, अर्जदाराचा व्यवसायाचा ठिकाणच्या पत्याचा पुरावा, निवासाच्या ठिकाचा पुरावा, फर्म नोंदणीच्या पुराव्याची कागदपत्रे, बँक गॅरंटी / पतदार प्रमाणपत्र / रोख तारण बाबतचे पुरावे / कागदपत्र, वचनपत्र रुपये 500/- च्या बाँड पेपर वर, परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे आवश्यक ते मुद्रांकित केलेल्या करारनाम्याची पत्र रुपये 500/- च्या बाँड पेपर वर, चांगल्या वर्तणुकीबद्दल दोन दाखले (राजपत्रीत अधिकार / आमदार / बा.स. सदस्य)

आ. अडत अनुज्ञप्ति – अर्जदाराचे दोन फोटो, अर्जदाराचा व्यवसायाचा ठिकाणच्या पत्याचा पुरावा, निवासाच्या ठिकाचा पुरावा, फर्म नोंदणीच्या पुराव्याची कागदपत्रे, बँक गॅरंटी / पतदार प्रमाणपत्र / रोख तारण बाबतचे पुरावे / कागदपत्र, वचनपत्र रुपये 500/- च्या बाँड पेपर वर, परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे आवश्यक ते मुद्रांकित केलेल्या करारनाम्याची पत्र रुपये 500/- च्या बाँड पेपर वर, चांगल्या वर्तणुकीबद्दल दोन दाखले (राजपत्रीत अधिकार / आमदार / बा.स. सदस्य)

इ. मदतनीस अनुज्ञप्ति - अर्ज, आधार कार्डची प्रत, परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे आवश्यक ते मुद्रांकित केलेल्या करारनाम्याची पत्र रुपये 500/- च्या बाँड पेपर वर, फर्मचे शिफारस पत्र, चांगल्या वर्तणुकीबद्दल दोन दाखले (राजपत्रीत अधिकार / आमदार / बा.स. सदस्य)

ई. मापारी अनुज्ञप्ति - अर्जदाराचे दोन फोटे, निवासाच्या ठिकाणचा पुरावा, शारीरिक क्षमता पात्रतेचा प्रमाणपत्र, चांगल्या वर्तणुकीबद्दल दोन दाखले (राजपत्रीत अधिकार / आमदार / बा.स. सदस्य), परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे आवश्यक ते मुद्रांकित केलेल्या करारनाम्याची पत्र रुपये 500/- च्या बाँड पेपर वर .

उ. हमाल अनुज्ञप्ति – अर्जदाराचे दोन फोटे, निवासाच्या ठिकाणचा पुरावा, शारीरिक क्षमता पात्रतेचा प्रमाणपत्र, चांगल्या वर्तणुकीबद्दल दोन दाखले (राजपत्रीत अधिकार / आमदार / बा.स. सदस्य), परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे आवश्यक ते मुद्रांकित केलेल्या करारनाम्याची पत्र रुपये 500/- च्या बाँड पेपर वर .

डिमांड विभाग

परवानाधारक अडते व खरेदीदार मार्केट यार्डवर खरेदी – विक्रीच्या नोंदणी धान्य डिमांड ‍ विभागात होते, व मार्केट फी व सुपरव्हिजन फी ची आकारणी या विभागांतर्गत होते.

अडत / खरेदी तपासणी विभाग

दैनंदिन अडत / खरेदी ‍बिलांची माहवार तपासणी केली जाते.

शेतमाल तारण विभाग

शेतक-यांना त्यांचे शेतमाल तारणावर तारण कर्ज देण्यात येते. हंगामाच्या काळात बाजार मध्ये शेतमालाची आवक वाढलेली असते बरेचवेळा आवक जास्त असल्याने भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात शेतक-यांना शेतमाल कर्ज भावाने कावा लागुनये व त्यांची पैशाची गरज भगविण्यासाठी या करात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंळाचे निर्देशनाने बाजार समिती स्व:फंडातुन शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. या विभागात शेतक-यांने शेतमालवार आवश्यक त्या कागद पत्राची पूर्तता करुण तारण कर्ज देण्यात येते.

रोखपाल

बाजार समिती मधील मार्केट फी, सुपरव्हिजन फी, शेतमाल तारण, गाळा भाडे व इतर ‍ मिसलेनियस भरणा स्विकारण्यात येतो. रोख विभागातील रोख, धनादेश (चेक), नेट बँकीग द्वारे भरणा झालेल्या रकमांच्या पावत्या बनवून सदर भरणा बाजार समितीचे बँक खाते मध्ये दैनंदीन जमा केल्या जातो. या सर्व व्यवहाराची नोंद कॅश बुकला घेतल्या जाते.

धान्य विभाग

धान्य विभागात शेतक-यांन मार्फत येणा-या शेतमालाचे विक्री ही खुल्या लिलाव पध्दतीने करण्यात येते. सदर लिलाव हा परवानाधारक खरेदीदार, अडते व शेतकरी यांचा समोर होते. परवानाधारक मापा-यां कडुन शेतमालाचे अचुक मोजमाप करण्यात येते. बाजार समितीने नेमलेल्या कर्मचा-यां मार्फत सदर लिलावाची सौदा पट्टया देण्यात येते. शेतक-यांना त्याचे शेतमालाची रक्कम अडत्यां कडून मिळते.

आलु-कांदा विभाग

परवानाधारक अडते असुन विभागामध्ये आलु, लसन, कांदा, अद्रक व मिर्ची चा व्यापार केल्या जातो. त्याकडुन मार्केट फी व सुपरव्हिजन फी ची आकारणी करुण वसुल केली जाते. बाजार समितीचे कार्यक्षेत्रात आलु, लसन ई. चे उत्पन्न होत नाही. बाजार समिती मध्ये आलु (बटाटा) हा उत्तर प्रदेश मधील आग्रा, मध्य प्रदेश मधील खंडवा, इंदोर येथुन येतो. लसुन हा राजस्थान व मध्य प्रदेश, मिरची ही तेलंगाणा मधील हैद्राबाद, वारंगल व आंद्र प्रदेश मधील गुंटुर मधुन येते. कांदा हा बाजार समिती कार्यक्षेत्रातील व इतर ‍जिल्हातील शेतकरी बंधु बाजार समितीमध्ये आणतात.