कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोला

लोकनेते वसंतराव धोत्रे मार्केट यार्ड

विदर्भातील अग्रगन्य बाजार समिती

सन १८९८ साली कायदेशीर कॉटन मार्केट कमिट्यांची स्थापना झाली .१९३५ साली मार्केट कायद्यात सुधारणा झाल्यात. मार्केट कायद्यातील महत्वाची सुधारणा म्हणजे शेतक-यांना मार्केट कमिटीमध्ये प्रतिनिधीत्व मिळणे ही होती, १९३५ साली शेतक-यांना प्रतिनिधीत्व मिळाले. याच वर्षी तालुका सहकारी खरेदी विक्रीची स्थापना झाली आणि शेतक-यांचे प्रतिनिधी नेतृत्व पुढे येवू लागले. बळीराम अंबाजी कुचर, उत्तमराव शिवरामजी देशमुख, वामनराव हरिभाऊ खुरसडे, पंढरी तुकाराम पाटील, नामदेवराव बळीरामजी पाटील, मोतीराम रावजी काळणे इत्यादी शेतकरी प्रतिनिधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात कॉटन मार्केट कमिटीवर प्रतिनिधीत्व केले. स्वातंत्र्या पासून चे काळात पुंडलीकराव पाटील जायले, गोविंदराव पुंडलीकराव पाटील भौरदकर, रामभाऊ पुर्णाजी पाटील, निळकंठराव श्रीधर सपकाळ, डॉ. वामनराव रामकृष्ण कोरपे, तुळशीराम नामदेवराव पाटील पोहरे, रामभाऊ पुंडलीक पाटील, डॉ. भिकाजी हरिभाऊ पागृत, नामदेवराव शिवरामजी पाटील, त्र्यंबकराव विठोबा पाटील, आनंदराव हरिभाऊ बरडे, गोविंद रामजी सातपुते, नामदेवराव रामजी काठोके, वासुदेवराव नारायणराव माहोरे, रामभाऊ नारायणराव तावरे, बापुराव गुलाबराव महल्ले, शालीग्राम टल्लुजी पाटील, बलदेवराव अवधूतराव पाटील, श्री.ह. मानकर, मोतीराम उदेभानजी लहाने, गोपाळराव रूस्तमजी काकड, गोपाळराव नामदेवराव पोहरे, किसनराव ना. जाणुनकर, वसंतराव रामराव धोत्रे इत्यादी अनेक शेतकरी प्रतिनिधींनी हया संस्थेचे प्रतिनिधीत्व केले. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने या देशातील जनतेचा मुख्य् व्यवसाय शेती हाच होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील जनता ही शेती उत्पन्नावर अवलंबून होती. त्यामुळे स्वातंत्रपूर्व काळामध्ये विकेंद्रित बाजार व्यवस्था असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीकरिता आठवडी बाजार अथवा बाजारहाट्ची जागा शेतमाल विक्रीकरिता उपलब्ध होत्या.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी इंग्रजांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची भारतीयांना व्यवस्था दिली व त्याअधीन शेतकऱ्यांनी विकलेल्या शेतमालाला नियंत्रित केन्द्रीत बाजार व्यवस्था निर्माण करण्याचे दृष्टीने कॉटन मार्केट कमिटीची स्थापना १८८६ साली झाली व १८९७ साली कॉटन रेग्युलेशन अॅक्ट लागू झाला. १ एप्रिल १८९८ च्या हैदराबाद रेसिडन्सी ऑर्डर नं.७९-१ चे नोटिफिकेशननुसार अमरावती विभागातील ९ ठिकाणी कॉटन मार्केटचे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले.

वऱ्हाड अन सोन्याची क-हाड ही म्हण प्रसिद्ध होती कारण विदर्भातील जमीन ही सुपीक व पिकाची होती त्यामुळे या भागामध्ये कापूस हे प्रामुख्याने नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनाला प्राधान्य दिले व या भागामध्ये स्वातंत्र्यानंतर कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते व त्यानुसार बाजार व्यवस्था सुद्धा उभ्या झाल्या. परंतु शेतमाल खरेदी विक्री व्यवस्थेकरिता आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने शासनस्तरावरून निधी किंवा विशेष प्रयत्न न झाल्यामुळे बाजार समित्यांनी प्राप्त होणाऱ्या बाजार निधीमधून आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला व त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेच प्रतिनिधी बाजार समित्यांवर असल्यामुळे शेतकऱ्यांना प्राधान्याने कशाची आवश्यकता आहे याचा विचार करून नियोजनबध्द पद्धतीने आजची बाजार व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला असल्याचे महाराष्ट्रामध्ये दिसून येते.

'अकोला कृषि उत्पन्न बाजार समिती' ही अग्रगण्य बाजार समिती असून बाजार समितीने आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा शेतमाल विक्री व्यवस्थेकरिता उपलब्ध करून दिल्या असून लोकनेते माजी सहकार राज्यमंत्री स्व वसंतरावजी धोत्रे यांचे मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असून त्यांनी दाखविलेल्या मार्ग पथावर बाजार समिती कामकाज करीत असून शेतकऱ्यांचे विश्वासास पात्र ठरलेली बाजार समिती ही ओळख निर्माण करण्यात अकोला कृषि उत्पन्न बाजार समिती यशस्वी झाली आहे. स्व.श्री. वसंतराव रामराव धोत्रे यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1937 रोजी अकोला तालुक्यातील पळसो (बढे) या गावी झाला. नागपुर विद्यापिठातुन बी.कॉम. ची पदवी प्राप्त केल्यानंतर 1960 साली त्यांनी सामाजिक कार्यात भाग घेतला. ते 1967-1985 या काळात जिल्हा परिषद, अकोला येथे सदस्य होते. त्यांनी सन 1971 ते 1986 साला पर्यंत अकोला कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये सभापती स्थान भुषविले. सन 1985 ते 1990 या पाच वर्षात ते बोरगांव मतदार संघातुन विधान सभा सदस्य म्हणून निर्वाचित झाले व 1986 ते 1988 दरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे सहकार व वने राज्यमंत्री होते. त्या दरम्यान अकोला कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती स्थान श्री. अवचित्तराव बेले यांनी भुषविले व त्या नंतर 1994 ते 2002 पर्यंत बाजार समिती चे सभापती म्हणुन पुन्हा श्री. वसंतराव धोत्रे झालेत. श्री. वसंतराव धोत्रे यांनी बाजार समिती मध्ये 23 वर्षे सभापती स्थान भुषविले व त्यानंतर ते बाजार समितीचे संचालक म्हणून कार्यरत होते व त्यानंतर श्री. शिरीष वसंतराव धोत्रे यांनी 2002 पासुन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदाचा पदभार स्विकारला.

श्री. शिरीष वसंतराव धोत्रे यांनी अभियंत्रिकी स्नातक (इलेक्ट्रानिक्स) ची पदवी पुणे विद्यापिठातुन प्राप्त केल्या नंतर सन 1991 पासुन त्यांनी सामाजिक व राजकीय कार्यात सहभाग घेतला. ते पळसो मतदार संघातुन 1998 साली जिल्हा परिषद अकोला चे सदस्य म्हणून निर्वाचीत झाले. कृषि उत्पन्न बाजार समितीचे सहावे कार्यकारी मंडळा पासुन आजतागायत ते कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद भुषवित असुन त्यांचे सभापती पदाचा कार्यकाळ हा 23 वर्षाचा होत आहे.

माजी राज्यमंत्री, बाजार समितीचे माजी सभापती लोकनेते वसंतराव धोत्रे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभलेले बाजार समितीचे विद्यामान सभापती श्री. शिरीष वसंतराव धोत्रे यांनी अकोला बाजार समितीला प्रगतीच्या वाटेवर नेले व एक अग्रगन्य बाजार समिती म्हणून लौकीक प्राप्त करुन दिला. अकोला तालुक्यातील शेतक-यांच्या उच्च शिक्षण घेणा-या पाल्यांना शिष्यवृत्ती सारखी एक आगळी वेगळी योजना राबवित असल्याबद्दल तसेच शेतीमध्ये मजुरांची अनुपलब्धता असल्याने शेतीचे यांत्रीकीकरणे करणे करीता शेतक-यांना शेती उपयोगी ट्रॅक्टर करीता आर्थिक मदत करीत आहे. आत्महत्याग्रस्त व अपघातीग्रस्त शेतक-यांचे कुटुंबियांना आर्थिक मदत देणे, शेतक-यांच्या दुर्धर आजारावर आर्थिक करणे तसेच शेतक-यांची गाय, म्हैस, बैल अपघाताने किंवा सर्पदंशाने मृत्यु झाल्यास त्यांना आर्थिक मदत करीत आहेत. बाजार समिती व्यवस्थापन अत्यांत काटकसरीने काम करीत असून शेतकरी हिताचे दृष्टीने जे निर्णय घेतले ते खरोखरच कौतुकास्पद आहेत. अनेक शेतकरी हितोपयोगी उपक्रम बाजार समिती मध्ये सुरु करणारी भारतातील एकमेव बाजार समिती आहे.

२००५ साली केंद्र व राज्य शासनाने या कायद्यात सुधारणा करून शेतक-यांना मध्यस्थ व मार्केट कायद्याचे चाकोरीतून मुक्त करण्याचे दृष्टिने आवश्यक त्या तरतुदी केल्या आहेत. या मागील शासनाचा उद्देश शेतकरी हिताचा आहे असे म्हटले जात आहे. कदाचित ही शेतमाल विक्रीच्या नव्या व्यवस्थेची नांदी असेल. या नवीन कायद्याच्या व्यवस्था शेतक-यांना काय लाभ देतील हे येणारा काळच सांगेल.

परंतु बाजार समिती ही नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देउन काम करत आली आहे व येणा-या बदलांना सामोरे जाऊन निश्चीतच शेतकरी हित जपण्याचा प्रयत्न बाजार समिती करणार आहे.