परवानाधारक अडते असुन विभागामध्ये आलु, लसन, कांदा, अद्रक व मिर्ची चा व्यापार केल्या जातो. त्याकडुन मार्केट फी व सुपरव्हिजन फी ची आकारणी करुण वसुल केली जाते. बाजार समितीचे कार्यक्षेत्रात आलु, लसन ई. चे उत्पन्न होत नाही. बाजार समिती मध्ये आलु (बटाटा) हा उत्तर प्रदेश मधील आग्रा, मध्य प्रदेश मधील खंडवा, इंदोर येथुन येतो. लसुन हा राजस्थान व मध्य प्रदेश, मिरची ही तेलंगाणा मधील हैद्राबाद, वारंगल व आंद्र प्रदेश मधील गुंटुर मधुन येते. कांदा हा बाजार समिती कार्यक्षेत्रातील व इतर जिल्हातील शेतकरी बंधु बाजार समितीमध्ये आणतात.